विधिमंडळाच्या सभागृहात चर्चा असताना सुरु गांभीर्य न दाखवितात.रमी खेळत बसलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा,अशी मागणी राष्ट्रवादी माजी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.या घटनेमुळे संपूर्ण राज्यभर कृषिमंत्र्यांवर टीकेची झोड उठत आहे. हा सभागृहाचा आणि पदाचाही अपमान आहे.त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा.ते राजीनामा देत नसतील तर,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तातडीने पदमुक्त करायला हवे.मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या घोषणेत सरकारने फिरवलेला शब्द शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे ते म्हणाले.सन २०२४ मध्ये सरकारने महाराष्ट्रातील प्रमुख पीक असलेल्या धानाबाबत बोनस जाहीर केला.मात्र नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना बोनस देणार असल्याचे स्पष्ट करण्यात येऊनही जीआरमध्ये बदल करून फक्त खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांनाच बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.तो अन्यायकारक आहे. यामुळे सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम सरकारने तत्काळ व सरसकट जमा करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली.
