2 लाख 95 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त…गडेगाव येथील घटना…दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर एक फरार.
भंडारा जिल्हाच्या लाखनी तालुक्यातील खुटसावरी येथे सिद्धी इंडस्ट्रियल गॅस प्रोडक्स लिमिटेड कंपनी समोरील रोडवर हल्दीराम कंपनीचा दुधाचा टेम्पो वाहनातून अवैधरित्या सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी मोठ्या चालाखीने धाड सापळा रचत कारवाही करून 2 लाख 95 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सुगंधित तंबाखू जप्त केली आहे तर दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.ही सुगंधित तंबाखू नागपूर येथून आणत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
