नागपूर स्थीत लहुजी विद्यार्थी संघ, नागपूर व जिजाऊ-सावित्री-मुक्ता बहुउद्देशीय महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जगविख्यात साहित्यसम्राट सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त रविवारी (३१ ऑगस्ट) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला समाज बांधव तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कमला नेहरू महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. अशोक कांबळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थान मा. प्रभाकर शिंदे यांनी भूषवले. उद्घाटन प्रसंगी कांबळे यांनी अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले, तर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना समाजासाठी उपयुक्त ठरणारे शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते व मार्गदर्शक म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे वंशज (नातू) राष्ट्रीय अध्यक्ष – डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना, यांनी लहुजी विद्यार्थी संघाच्या शैक्षणिक उपक्रमातून सामाजिक, आर्थिक विकास या कार्याचे सर्वप्रथम कौतुक केले तसेच याप्रसंगी “मी नव्हे, आपण” ही भूमिका स्वीकारल्यास समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असे प्रतिपादन केले. “अण्णाभाऊंच्या साहित्यकृती त्यातील विचार मुल्य, स्वाभिमान, नितिमत्ता, चारित्र्य, जिद्द, लढा आणि आत्मसन्मान शिकवतात. समाजाची आजही अवस्था म्हणावी तशी बदलेली नाही ती बदलण्यासाठी मान-सन्मान बाजूला ठेवून संवेदनशीलतेने व संघटितपणे काम केल्यास आपण प्रगती साधू शकतो,” असे ते म्हणाले. तसेच या प्रसंगी आरक्षण उपवर्गीकरण लढ्याचे वर्तमान वास्तव विशद करून पुन्हा एकदा संघटीत लढा दिला तर समाजास यश मिळेल असा आशावाद देखील व्यक्त केले. त्यांच्या भाषणाने उपस्थित समाज बांधव व विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास जागृत झाला.
दुसऱ्या सत्रातीलविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथुन आलेले मा. गोविंदजी मोरे यांनी देश विदेशातील नामांकित शिक्षण संस्थांमधील प्रवेशप्रक्रिया, संधी, शिष्यवृत्ती आणि यासाठीची परिक्षा पुर्व तयारीचा उलगडा केला. यानंतर समाजाच्या विकासासाठी ARTI च्या विविध योजना व कार्यक्रम याबाबत चे मार्गदर्शन करण्यासाठी आर्मीचे प्रकल्प संचालक मा. डी. ई. नामवाड हे उपस्थित होते. यांनी आर्टी संस्थेच्या योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना व समाज बांधवांना या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात संस्थेचे अविरत कार्य करीत असलेले जेष्ठ कार्यकर्ते मा. सुभाष साळवे, मा. राजू खडसे आणि मा. सोहम ठाकरे यांचा विशेष सत्कार समाज गौरव पुरस्काराने करण्यात आला. याशिवाय समाजातील गुणवंत विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांचे देखील गौरव करण्यात आले.
कार्यक्रमाला निरीक्षण अधिकारी प्रवीण वानखेडे मा. पंजाब नॅशनल बँक ऑफ इंडिया मा. प्रशांत अवसरे, मा प्रा डॉ अंभोरे मा.संजय सोनटक्के उद्योजक आदी मान्यवर उपस्थित राहिले.
या कार्यक्रमात संस्थेचे अविरत कार्य करीत असलेले जेष्ठ कार्यकर्ते मा. सुभाष साळवे, मा. राजू खडसे आणि मा. सोहम ठाकरे यांचा विशेष सत्कार समाज गौरव पुरस्काराने करण्यात आला. याशिवाय समाजातील गुणवंत विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांचे देखील गौरव करण्यात आले.
कार्यक्रमाला निरीक्षण अधिकारी प्रवीण वानखेडे मा. पंजाब नॅशनल बँक ऑफ इंडिया मा. प्रशांत अवसरे, मा प्रा डॉ अंभोरे मा.संजय सोनटक्के उद्योजक आदी मान्यवर उपस्थित राहिले.









