अल्पवयीन मुलीवर हॉस्पिटलमध्ये अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पसार असलेले आरोपी डॉ. देवेश अग्रवाल यांनी अखेर भंडारा न्यायालयात आत्मसमर्पण केले. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. डॉ. अग्रवाल यांनी 9 जुलै रोजी साकोली येथील श्याम हॉस्पिटलमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफीच्या बहाण्याने अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आरोपी होता. पीडित मुलगी तिच्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली असताना डॉक्टरांनी सोनोग्राफी करताना आई व परिचारिकेला बाहेर पाठवले आणि एकांतात मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी साकोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हा पासून डॉक्टर फेरी होता. अखेर त्याने जिल्हा न्यायालयात स्वतः आत्मसमर्पण केलं आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 45